मराठीतील सर्व म्हणी | Marathi Mhani with Meaning List

 मराठीतील सर्व म्हणी Marathi Mhani with Meaning List: मराठी व्याकरण मध्ये नेहमी वापरल्या जाणाऱ्या ५०० हुन अधिक मराठी म्हणी संग्रह व मराठी म्हणी व त्यांचे अर्थ.

मराठीतील सर्व म्हणी

मराठी जुन्या म्हणी, आधुनिक म्हणी, गावरान, मराठी भाषेतील असभ्य म्हणी आणि वाक्प्रचार, मराठी विनोदी म्हणी, ऐतिहासिक म्हणी, मराठी म्हणींचा संग्रह व त्याचे अर्थ, वाक्यात उपयोग स्पष्टीकरणासह खाली दिलेल्या आहेत. सर्वप्रथम आपण म्हणी म्हणजे काय बघूया.

Mhani in Marathi:

म्हणी म्हणजे पारंपारिक वाक्य कि जे अनुभवावर आधारित समजलेल्या सत्याची अभिव्यक्ती करते.

ह्या मराठी म्हणी स्पर्धा परीक्षा ची तयारी करणाऱ्यासाठी अत्यंत उपयुक्त आहेत. नेहमी अभ्यासक्रमात ”मराठी व्याकरण” या विषयामध्ये म्हणी यावर प्रश्न विचारले जातात.

म्हणी वर विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांचे उदाहरण:

  • मराठी म्हणी ओळखा.
  • म्हण पूर्ण करा.
  • म्हणीचा अर्थ सांगा.
  • वाक्यात उपयोग करा.

सहसा विचारल्या जाणाऱ्या ५०० मराठी म्हणीचा संग्रह दिला आहे अर्थांसोबत

मराठीतील सर्व म्हणी Marathi Mhani with Meaning List:

1. अगं अगं म्हशी मला कोठे नेशी

स्वत:ची चूक मान्य करण्याऐवजी त्यासाठी इतरांवर दोष ठेवणे.

2. पी हळद हो गोरी

उतावळेपणा दाखविणे

3. आपला हात जगन्नाथ

आपली प्रगती आपल्या कर्तृत्वावर अवलंबून असते.

4. मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही

प्रत्यक्ष अनुभव घेतल्याशिवाय कळत नाही

5. अति तेथे माती

कोणत्याही गोष्टीचा अतिरेक वाईटच असतो.

6. बाप दाखव नाहीतर श्राद्ध कर

दोनपैकी एक पर्याय निवडणे

7. आयत्या बिळात नागोबा

दुसर्‍याने स्वत:साठी केलेल्या गोष्टीचा आयता फायदा उठविणे.

8. चार दिवस सासूचे चार दिवस सुनेचे

प्रत्येकाची वेळ कधीतरी येतेच

9. उंटावरचा शहाणा

मूर्ख सल्ला देणारा

10. आईजीच्या जीवावर बाईजी उदार

दुसर्‍याचा पैसा खर्च करून औदार्य दाखविणे.

11. नाचता येईना अंगण वाकडे

स्वत:स चांगले काम येत नसणारा दुसऱ्याचे दोष काढतो

12. आपल्याच पोळीवर तूप ओढणे

फक्त स्वत:चाच तेवढा फायदा साधून घेणे.

13. छत्तीसाचा आकडा

विरुद्ध मत असणे

14. आंधळे दळते कुत्रं पीठ खाते

एकानं काम करावं आणि दुसर्‍यांनं त्याचा फायदा घ्यावा.

15. तेरड्याचा रंग तीन दिवस

एखादे कार्य थोडे दिवस जोरात चालून एकदम बंद पडणे

16. आधी पोटोबा मग विठ्ठोबा

आदी पोटाची सोय पाहावी नंतर देवधर्म करावा.

17. अडला हरी गाढवाचे पाय धरी

एखाद्या हुशार माणसाला देखील अडचणीच्या वेळी मूर्ख माणसाची विनवणी करावी लागते.

18. आंधळा मागतो एक डोळा, देव देतो दोन डोळे

अपेक्षेपेक्षा जास्त फायदा होणे.

19. अति शहाणा त्याचा बैल रिकामा

जो माणूस फार शहाणपणा करायला जातो. त्याचे मुळीच काम होत नाही.

20. आधी शिदोरी मग जेजूरी

आधी भोजन मग देवपूजा

21. दुष्काळात तेरावा महिना

संकटात अधिक भर

22. असतील शिते तर जमतील भुते

एखाद्या माणसाकडून फायदा होणार असला की त्याच्या भोवती माणसे गोळा होतात.

23. नव्याचे नऊ दिवस

नवेपणा असतानाचे कौतुक नंतर टिकत नही

24. आचार भ्रष्टी सदा कष्टी

ज्याचे आचार विचार चांगले नसतात. तो नेहमी दु:खी असतो.

25. वासरात लंगडी गाय शहाणी

अडाणी लोकात अल्प ज्ञान असणारा शहाणा ठरतो

26. आपला तो बाब्या दुसर्‍याचं ते कारटं

स्वत:चे चांगले आणि दुसर्‍यांचे वाईट अशी प्रवृत्ती असणे.

27. आपण हसे लोकाला, शेंबूड आपल्या नाकाला

ज्या दोषाबद्दल आपण दुसर्‍याला हसतो. तोच दोष आपल्या अंगी असणे.

28. रात्र थोडी सोंगे फार

काम भरपूर, वेळ कमी

29. आधी बुद्धी जाते नंतर लक्ष्मी जाते

अगोदर आचरण बिघडते नंतर दशा बदलते.

30 . नाकाचा बाल

अत्यंत प्रिय व्यक्ती

31. अचाट खाणे मसणात जाणे

खाण्यापिण्यात अतिरके झाल्यास परिणाम वाईट होतो.

32. आई जेवू घालीना बाप भीक मागू देईना

दोन्ही बाजूंनी अडचण

33. आलीया भोगाशी असावे सादर

कुरकुर न करता निर्माण झालेली परिस्थिती स्वीकारणे.

34. आवळा देऊन कोहळा काढणे

क्षुल्लक गोष्टीचा मोबदल्यात मोठा लाभ करून घेणे.

35. अंथरूण पाहून पाय पसरावे

आपल्या ऐपतीप्रमाणे खर्च ठेवावा.

36. कामापुरता मामा

काम साधण्यापुरते गोड बोलणे

37. आपलेच दात आपलेच ओठ

आपल्याच माणसाने चूक केल्यावर अडचणीचे स्थिती निर्माण होणे.

38. आधीच उल्हास त्यात फाल्गुन मास

मुळातच आळशी माणसाच्या आळशी वृत्तीला पोषक अवस्था निर्माण होणे.

39. आईचा काळ बायकोचा मवाळ

आईकडे दुर्लक्ष करून बायकोची काळजी घेणारा

40. आठ हात लाकूड अन नऊ हात ढिपली

अत्यंत मूर्खपणाची अतिशयोक्ती.

41. अळी मिळी गुप चिळी

रहस्य उघडकीला येऊ नये म्हणून सर्वांनी मूग गिळून बसणे.

42. अहो रूपम अहो ध्वनी

एकमेकांच्या मर्यादा न दाखवता उलटपक्षी खोटी स्तुती करणे.

43. इच्छा तेथे मार्

ग एखादी गोष्ट करण्याची इच्छा असेल तर काहीतरी मार्ग निघतोच.

44. इकडे आड तिकडे विहीर

दोन्ही बाजूंनी अडचणीची परिस्थिती असणे.

45. उठता लाथ बसता बुकी

प्रत्येक कृत्याबद्दल अद्दल घडविण्यासाठी पुन्हा पुन्हा शिक्षा करणे.

46. उडत्या पाखरची पिसे मोजणे

अगदी सहजपणे अवघड गोष्टीची परीक्षा करणे.

47. उधारीचे पोते सव्वाहात रिते

उधारी घेतलेल्या गोष्टीत तोटा ठरलेलाच असतो.

48. उंदराला मांजर साक्ष

वाईट कृत्य करतांना एकमेकांना साक्ष देणे.

49. उचलली जीभ लावली टाळ्याला

विचार न करता बोलणे.

50. उतावळा नवरा गुडघ्याला बाशिंग

प्रसंगी हास्यास्पद ठरेल आशा प्रकराच्या उतावळेपणा दाखविणे.

संपूर्ण मराठी व्याकरण नोट्स

51. उथळ पाण्याला खळखळाट फार

थोडासा गुण अंगी असणारा माणूस जास्त बढाई मरतो.

52. उस गोड लागला म्हणून मुळासकट खाऊ नये

कोणत्याही चांगल्या गोष्टीचा किंवा एखाद्याच्या चांगुलपणाचा प्रमाणाबाहेर फायदा घेऊ नये.

53. एक ना घड भारभर चिंध्या

एकाच वेळी अनेक कामे करायला घेतल्यावर सर्वच कामे अर्थवट होण्याची अवस्था.

54. एका माळेचे मणी

सगळीच माणसे सारख्या स्वभावाची.

55. एका हाताने टाळी वाजत नाही

दोघांच्या भांडणात पूर्णपणे एकट्यालाच दोष देता येत नाही किंवा एखाद्या कृत्यात दोघेही दोषी असणे.

56.ऐकावे जनाचे करावे मनाचे

लोकांचे ऐकून घ्यावे व मग आपल्याला जे योग्य वाटेल ते करावे.

57. उंटावरून शेळ्या हाकणे

आळस, हलगर्जीपणा करणे

58. एका म्यानात दोन तलवारी राहू शकत नाहीत

दोन तेजस्वी माणसे एकत्र गुण्यागोविदाने नांदू शकत नाहीत दोन सवती एका घरात सुखासमाधानाने राहू शकत नाहीत.

59. कावळ्याच्या शापाने गाय मरत नाही

संपूर्ण म्हणी वाचण्यासाठी येथे क्लीक करा.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या