लोकमान्य टिळक मराठी निबंध Essay on Lokmanya Tilak in Marathi: लोकमान्य टिळक हे त्या स्वातंत्र्यसैनिकांपैकी एक मानले जातात जे त्यांच्या लढाऊ चेतना, विचारधारा, धैर्य, बुद्धिमत्ता आणि अटल देशभक्तीसाठी ओळखले जातात. ‘स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध अधिकार आहे आणि तो मी मिळवणारच’ ही सिंह गर्जना लोकमान्यांनी केली होती.
लोकमान्य टिळक माहिती मराठी निबंध Lokmanya Tilak Information in Marathi
लोकमान्य टिळक हे केवळ राजकारणी नव्हते तर एक महान अभ्यासक आणि तत्वज्ञ होते. त्यांचे मूळ नाव बाळ गंगाधर टिळक होते. त्यांचा जन्म २३ जुलै १८५६ रोजी महाराष्ट्रातील रत्नागिरी जिल्ह्यात चिखली या गावी झाला. त्यांचा जन्म एका मध्यमवर्गी ब्राह्मण कुटुंबात झाला होता.
त्यांच्या आजोबांचे नाव केशवराव होते, ते पेशवे राज्यात उच्च पदावर होते. त्यांच्या आईचे नाव पार्वतीबाई गंगाधर टिळक आणि वडिलांचे नाव रामचंद्र गंगाधरपंत टिळक होते. टिळकांचे वडील गंगाधरपंत हे एक शिक्षक होते. त्यांनी बाळ टिळकांना घरी संस्कृत, मराठी, गणिताचे उत्तम ज्ञान दिले होते.
0 टिप्पण्या