संत एकनाथ महाराजांची माहिती, निबंध व अभंग | Sant Eknath Information in Marathi

 संत एकनाथ माहिती Sant Eknath Information in Marathi: हे संत ज्ञानेश्वर (Sant Dnyaneshwar) आणि संत नामदेव (Sant Namdev) यांच्या कार्याचे आध्यात्मिक उत्तराधिकारी मानले जाणारे, महाराष्ट्रातील एक महान संत होते. संत एकनाथ महाराज (Sant Eknath Maharaj) हे लोकांना जागृत करण्यासाठी त्यांच्या आध्यात्मिक पराक्रमासाठी तसेच धर्मरक्षणासाठी केलेल्या अथक प्रयत्नांसाठी परिचित होते.

ज्ञानदेवांनी स्थापलेल्या वारकरी संप्रदायामधील संत एकनाथ हे एक संत होते. संत एकनाथ भक्ती आणि आध्यात्मावर लिहिलेल्या असंख्य स्तोत्रे आणि पुस्तकांचे लेखक आहेत, ज्यात प्रसिद्ध भगवद्गीताचे आध्यात्मिक सार, एकनाथी भागवत आणि त्यांचे विशाल भव्य रामायण यांचा समावेश आहे.


संत एकनाथ माहिती Sant Eknath Information in Marathi

जन्म आणि कुटुंब Early Life and Family  Information of Sant Eknath:

संत एकनाथांचा जन्म संत भानुदासांच्या कुळामध्ये देशस्थ ऋग्वेदी ब्राह्मण कुटुंबात (Sant Eknath born on) 1533 साली पैठण (Paithan) येथे झाला. एकनाथ यांचे पंजोबा श्री भानुदास (1448-1513) होते, पंढरपूर येथील विठ्ठल पंथातील प्रमुख व्यक्ती होते. त्यांच्या आईचे नाव रुक्मिणी (Mother of Sant Eknath) तर वडिलांचे सूर्यनारायण (father of Sant Eknath) होते.

बालपणीच आई-वडील वारल्यामुळे एकनाथ पोरके झाले. आजोबांच्या छत्रछायेत ते लहानाचे मोठे झाले. आजोबांनी त्यांच्यावर सुसंस्कार केले. एकनाथांना लहानपणापासून अध्यात्माची व हरिकीर्तनाची आवड होती. गिरिजाबाई (wife of Sant Eknath) नावाच्या मुलीबरोबर त्यांचा विवाह झाला. गिरिजाबाई अतिशय गृहकुशल होत्या.

एकनाथांना गोदा व गंगा नावाच्या दोन मुली (Daughters of Sant Eknath) आणि हरिपंडित (son of Sant Eknath) नावाचा एक मुलगा होता. त्यांनी प्रपंच आणि परमार्थ यांची कुशलतेने सांगड घातली.

संपूर्ण माहिती वाचण्यासाठी येथे क्लीक करा.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या