प्रदूषण एक समस्या मराठी निबंध Pradushan Ek Samasya Marathi Nibandh: आज आपण प्रदूषणाच्या जगात जगत आहोत. पाणी, जमीन आणि आकाशात प्रदूषणाच्या राक्षसाने आपला अधिकार स्थापित केला आहे. सर्वत्र होणार्या प्रदूषणामुळे आपले आयुष्य भयानक चक्रात अडकले आहे.
प्रदूषण एक समस्या मराठी निबंध Pollution Essay in Marathi
प्रदूषणाचे प्रकार – प्रदूषण हा एक बहुमुखी दैत्य आहे. तो वायू प्रदूषण, जल प्रदूषण आणि ध्वनी प्रदूषण या स्वरूपात आपले आपले वर्चस्व गाजवत आहे. आपण दूषित वातावरणात श्वास घेत आहोत. लोकांना पिण्यासाठी स्वच्छ, शुद्ध पाणी मिळत नाही. दूषित पाणी आणि कीटकनाशकांमुळे पिकेदेखील दुषित होताना दिसून येत आहेत. आधुनिक यंत्रांचा आवाज आपल्या कानांना त्रास देत आहे. प्रदूषणाच्या या विविध प्रकारांमुळे या सुंदर सृष्टीच्या अस्तित्वावर प्रश्नचिन्ह लागले आहे.
0 टिप्पण्या